दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग २१
गौरवी एक पाऊल पुढे येते... आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत ठामपणे बोलते...
“छळाला जर तुम्ही कल्चर म्हणत असाल, आणि दहशतीला अधिकार समजत असाल... तर तो कल्चर बदलायला आणि दहशतीचा अधिकार मोडीत काढण्यासाठी कुणीतरी सुरुवात केलीच पाहिजे..."
“छळाला जर तुम्ही कल्चर म्हणत असाल, आणि दहशतीला अधिकार समजत असाल... तर तो कल्चर बदलायला आणि दहशतीचा अधिकार मोडीत काढण्यासाठी कुणीतरी सुरुवात केलीच पाहिजे..."
ती क्षणभर थांबते...
"आणि आज ती सुरुवात मी करते आहे..."
"आणि आज ती सुरुवात मी करते आहे..."
आजूबाजूचे विद्यार्थी स्तब्ध झाले... आणि गौरवीकडे आश्चर्याने , आनंदाने, आशेने आणि विस्मयचकित नजरेने बघू लागले...
"मला रॅगिंग करणे आणि करवून घेणे मान्य नाही..." ती ठामपणे बोलते...
"आणि मी तुम्हाला घाबरावे... किंवा माझ्या चेहऱ्यावर भीती दिसावी असं जर तुम्हाला वाटत असेल..., तर तुम्ही फार चुकीचा विचार करत आहात..."
"कारण ती भीती तुम्हाला इथे मिळणार नाही..." गौरवी आपल्या चेहऱ्यावर एक बोट दाखवत बोलते...
आणि ती वळते… आणि ताठ मानेने पुढे चालू लागते...
माधव व त्याचे मित्र फक्त उभे बघत राहिले...
कारण आज पहिल्यांदाच
कोणीतरी फ्रेशर डरला नाही… तर खंबीर उभा राहिला होता...
कोणीतरी फ्रेशर डरला नाही… तर खंबीर उभा राहिला होता...
गौरवी ताठ मानेने पुढे निघून गेली…
पण तिच्या मागे कॉलेजचं वातावरण तसंच राहिलं नाही...
पण तिच्या मागे कॉलेजचं वातावरण तसंच राहिलं नाही...
काही क्षणांपूर्वी जिथे हशा, टाळ्या आणि सिनियरांचा दर्प भरून राहिला होता, तिथे आता अस्वस्थ शांतता पसरली होती.
फ्रेशर मुलं–मुली एकमेकांकडे पाहू लागली... कुणाच्या डोळ्यांत आश्चर्य होतं, कुणाच्या डोळ्यांत दिलासा, तर कुणाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडीशी हिंमत दिसत होती...
फ्रेशर मुलं–मुली एकमेकांकडे पाहू लागली... कुणाच्या डोळ्यांत आश्चर्य होतं, कुणाच्या डोळ्यांत दिलासा, तर कुणाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडीशी हिंमत दिसत होती...
“ती… घाबरलीच नाही रे…” घोळक्यातील एक जण हळूच कुजबुजला...
“माधवसमोर उभी राहिली…” दुसऱ्याच्या आवाजात विस्मय होता...
कुणीतरी मनातल्या मनात ठरवलं
"आज नाही, पण उद्या… मी पण आवाज उठवेन..."
"आज नाही, पण उद्या… मी पण आवाज उठवेन..."
गौरवी कॉलेजच्या आवारातून चालत होती... पावलांचा वेग सरळ होता…
पण आत कुठेतरी हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं... आणि हात हलकेच थरथरत होते, पण तिने ते घट्ट आवळले.
“घाबरले असते तर… आजही कुणाच्या हसण्याची शिकार झाले असते...”
पण आत कुठेतरी हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं... आणि हात हलकेच थरथरत होते, पण तिने ते घट्ट आवळले.
“घाबरले असते तर… आजही कुणाच्या हसण्याची शिकार झाले असते...”
तिला स्वतःचं बालपण आठवलं... गल्लीतले टोमणे,
आडनावावरून ओळख, आणि प्रत्येक वेळी गप्प बसण्याची शिकवण...
आडनावावरून ओळख, आणि प्रत्येक वेळी गप्प बसण्याची शिकवण...
आज मात्र…
ती गप्प बसली नव्हती... आज तिने पहिल्यांदाच स्वतःसाठी उभं राहण्याचं धाडस केलं होतं...
आणि त्या क्षणी तिला जाणवलं धैर्य म्हणजे भीती नसणं नाही,
तर भीती असूनही मागे न हटणं...
ती गप्प बसली नव्हती... आज तिने पहिल्यांदाच स्वतःसाठी उभं राहण्याचं धाडस केलं होतं...
आणि त्या क्षणी तिला जाणवलं धैर्य म्हणजे भीती नसणं नाही,
तर भीती असूनही मागे न हटणं...
मागे गेटजवळ... माधव अजूनही तिथेच उभा होता...
त्याच्या चेहऱ्यावरचा लालसरपणा हळूहळू रागात बदलत होता...
त्याच्या चेहऱ्यावरचा लालसरपणा हळूहळू रागात बदलत होता...
मित्र काहीतरी बोलत होते, पण त्याला एकही शब्द नीट ऐकू येत नव्हता... त्याच्या डोक्यात एकच वाक्य घुमत होतं...
“फ्रेशर… आणि वर मलाच उत्तर देते...?”
“फ्रेशर… आणि वर मलाच उत्तर देते...?”
त्याच्या जबड्यातली मुठ घट्ट आवळली गेली...
“फार उडतेय ती…” तो दात खाऊन म्हणाला.
“फार उडतेय ती…” तो दात खाऊन म्हणाला.
डोळ्यांत अपमान, आणि त्याहून जास्त… सूडाची ठिणगी पेटली होती त्याच्या आत...
“ही गोष्ट इथे संपलेली नाही…” तो मनात ठरवतो...
“ही गोष्ट इथे संपलेली नाही…” तो मनात ठरवतो...
त्या दिवशी कॉलेजमध्ये काहीतरी बदललं होतं...
कारण पहिल्यांदाच भीतीला आव्हान देण्यात आलं होतं…
आणि पहिल्यांदाच एक मुलगी फक्त फ्रेशर नव्हती... तर अन्यायाला वाचा फोडणारी ती एक सुरुवात होती...
कारण पहिल्यांदाच भीतीला आव्हान देण्यात आलं होतं…
आणि पहिल्यांदाच एक मुलगी फक्त फ्रेशर नव्हती... तर अन्यायाला वाचा फोडणारी ती एक सुरुवात होती...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा